बातम्या

'येवले चहा'वर एफडीएची कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे: येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा दावा भोवला असल्याची चर्चा आहे. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन 'येवले चहा'ने केले असल्याची बाब एफडीएच्या निदर्शनास आली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा एफडीएने दिला आहे. तुर्तास शहरात असणारे विविध चहा केंद्र हे साठा असेपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती समजते. दरम्यान, एफडीएने जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे अचानक तपासणी केली. त्यावेळी चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन एफडीएने जप्त केला आहे.

Web Title: FDA take action against yewale chaha tea

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT