बातम्या

TET परिक्षा अनुत्तीर्ण असलेल्या 8 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार...

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील मनपा आणि जिल्हा परिषद शाळांत शिकविणाऱ्या ज्या शिक्षकांकडे टीईटी अर्हता नसेल त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रेय जगताप यांनी गुरुवारी दिले. याचसंदर्भात खासगी शिक्षण संस्थांमधील अनुदानित व विनाअनुदानित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कार्यवाही संबंधित शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करायची आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा अनुत्तीर्णांच्या सेवासमाप्तीचे आदेश द्यावेत, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांना यासंदर्भात कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.

अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निर्णय होईपर्यंत संबंधित शिक्षकांना कारवाईतून वगळण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


ज्या शाळा अशा शिक्षकांची सेवा सुरू ठेवतील त्यांना १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतनासाठी अनुदान देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
टीईटी परीक्षा अनुत्तीर्णांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारचे अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी २५ नोव्हेंबरला प्राथमिक शिक्षण संचालनालयास दिले होते. त्यानंतर महिन्याने प्राथमिक शिक्षण संचालकांनी गुरुवारी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

 WebTittle ::  End the service of these 'teachers'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT