latur
latur  
बातम्या

पालकमंत्र्याकडून सांगितले जाणारे मृत्यूचे आकडे चुकीचे - संभाजी पाटील निलंगेकर

दीपक क्षीरसागर

लातूर : कोरोनाच्या Corona पहिल्या लाटेसोबत Wave जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी दुसरी लाटही गांभीर्याने घेतलेली नाही. यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोक मृत्यू Death पावले असताना मृत्यूचे खरे आकडे Figures लपवले जात आहेत. Death Figures Given By Guardian Minister Are Wrong - Sambhaji Patil Nilangekar

ही गंभीर बाब असून, आम्ही याचा लवकरच भांडाफोड करणार आहोत. मृत्यू पावलेल्या लोकांची खरी आकडेवारी आमच्याकडे आहे. समोरासमोर आल्यास आम्ही ही आकडेवारी पुराव्यानिशी देण्यास तयार आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर Sambhaji Patil Nilangekar यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हे देखील पहा -

जिल्ह्यात म्युकरमायकोसीस Mucormycosis रुग्णांची  Patients संख्या वाढत Increasing आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी श्री.निलंगेकर हे भाजपचे BJP जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, नगरसेवक अ‍ॅड.शैलेश गोजमगुंडे व पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. Death Figures Given By Guardian Minister Are Wrong - Sambhaji Patil Nilangekar

याच दरम्यान पालकमंत्री अमित Amit Deshmukh देशमुख यांची जिल्हाधिकारी Collector कार्यालयात बैठक सुरू होती. निवेदन देण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

पालकमंत्री सांगत नाहीत तोपर्यंत हलणार नाही, अशीच भूमिका प्रशासन घेत आहे. पालकमंत्र्यांकडून सांगितले जाणारे मृत्यूचे आकडे चुकीचे असून खरे आकडे आमच्याकडे आहेत. हे आकडे लपवून सरकारला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या खर्चात बचत करायची आहे.  Death Figures Given By Guardian Minister Are Wrong - Sambhaji Patil Nilangekar

कोरोनातून बरे झालेल्या, कोरोनाग्रस्त मधुमेही रूग्ण, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन व मोठे उपचार घेतलेल्यांना म्युकरमायकोसिस आजाराचा धोका होत आहे. जिल्ह्यात या आजाराचे सध्या मोठे संख्येने रूग्ण असून, या आजारावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत.

यामुळे या आजाराचा संभाव्य धोका असलेल्या रुग्णांचा शोध गाव पातळीवरील यंत्रणेकडून घ्यावा व रुग्णांना लक्षणे दिसून येताच तातडीने उपचार मिळवून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचेही श्री.निलंगेकर यांनी या वेळी सांगितले. आमदार कराड यांनीही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची खरी आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT