raju patil. 
बातम्या

शीळ रोडच्या काँक्रिटीकरणात भ्रष्टाचार; आमदार राजू पाटील यांचा आरोप

साम न्युज ब्युरो

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे गेल्या काही महिन्यांपासून काम सुरु आहे. मात्र याच रस्त्याला काही कालावधीतच खड्डे पडले ही बातमी सर्वात प्रथम साम टीव्हीने दाखवली. त्यानंतर हे खड्डे बुजवले गेले होते. मात्र आता याच रस्त्याला डांबराचे पॅच मारले आहेत.याच पॅच चा व्हीडिओ मनसे आमदार राजू पाटील ट्विट केला. तसेच कामात कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नसून कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे, हे आता सिद्ध होत आहे असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.(Corruption in concreting Sheel Road; Allegation of MLA Raju Patil)

कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदकरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सध्या सुरु आहे. मात्र हे काम चांगल्या प्रकारे होत नसल्याचे आता दिसून येत आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आवाज उठवला असून यात रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. आमदार यांनी सांगितले की रस्ते कामात कुठल्याही प्रकारची गुणवत्ता दिसून येत नाही. अधिकारी वर्गास वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही.

हे देखील पाहा

रस्ते कामात भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. तो आता खरा असल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचारात लोकप्रतिनिधींची ही मिलीभगत आहे. या रस्त्यावरील टोलनाका बंद करण्यात आला आहे. मात्र तो हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याची मागणी अधिकारी वर्गाकडे करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अद्याप पाहणी केली जात नाही.

पाहणी दौऱ्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचबरोबर या रस्त्याच्या कामाचे स्वखर्चातून थर्ड पार्टी ऑडीट करुन रस्ते कामाची गुणवत्ता तपासण्यात येईल असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Edited By ; Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Kabootar Khana: वीज कापली, खोली पाडली, जाळी लावण्याचे काम सुरू; दादरचा कबूतरखाना बंद करणार|VIDEO

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

SCROLL FOR NEXT