anitgen test
anitgen test 
बातम्या

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..

चेतन इंगळे

वसई/ विरार : शहरात कडक निर्बंध Strict restrictions लागू असताना नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे विरार Virar पोलिसांनी Police शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांचीच कोरोना Corona चाचणी करायला सुरुवात केली आहे. विरार पूर्व मधिल मनवेल पाडा Manvel Pada सिग्नल जवळ ही चाचणी केली जात आहे. Corona test report get positive of people wandering for no reason

या चाचणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत एका बसचा Bus समावेश करण्यात आला आहे. जे नागरिक रस्त्यावर फिरत असतात त्यांना बसमध्ये बसून आणले जात आहे आणि यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळून आले, त्यांना कोरोना केंद्रात नेण्यात येत आहे. या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे.

त्यामधून अनेक फिरणाऱ्या नागरिकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तरी रस्त्यावर योग्य कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या लोकांवर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी देखील नागरिक रस्त्यावर मोकाट फिरताना दिसत आहे. म्हणून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची वसई/ विरार शहरात कोरोना चाचणी केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai crime : उरणमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Grah Gochar: १ मे पासून 'या' राशींचं पलटणार नशीब; मेषमधील सूर्य-शुक्राच्या युतीमुळे मिटतील अडचणी

Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Vegetables Rate Increased In APMC: उष्णता वाढल्यामुळे आवक घटली; भाजीपाला महागला, काय आहेत आजचे दर?

Jalana News: हृदयद्रावक! बोअरवेल सुरू करताना विद्युत केबलने पेट घेतला.. महिलेचा होरपळून मृत्यू; जालना हळहळलं

SCROLL FOR NEXT