Corona positive patient suicide 
बातम्या

खळबळजनक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या... 

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद Pusad येथील कोरोना Corona सेंटरमध्ये एका रुग्णानी आत्महत्या केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महागाव Mahagaon तालुक्यातील गुंज येथील रहिवासी बळीराम मोतीराम राठोड (वय ५५) असे मृतकाचे नाव आहे. Corona positive patient suicide

बळीराम हे कोरोना पॉझिटिव्ह Positive असल्याने त्यांना पुसद येथील एका खासगी दवाखान्यांमध्ये २८ मे या दिवशी भरती करण्यात आले होते. मात्र, खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी बळीराम राठोड यास उपजिल्हा रुग्णालय Hospital पुसद येथे ३० मे या दिवशी भर्ती करण्यात आले होते.

उपचारानंतर तब्येतीत मध्ये सुधारणा सुद्धा झाली होती. त्यानुसार, एक दोन दिवसात सोडणार सुद्धा होते. मात्र, दरम्यान रात्रीत बळीराम राठोड यांनी प्रसाधनगृहातील खिडकीच्या लोखंडी गजाला आपल्या शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. Corona positive patient suicide

 हे देखील पहा 

ही बाब डॉक्टरांच्या राऊंड दरम्यान उघडकीस आली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस Police हजर झाले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बळीराम मोतिराम राठोड यांच्या पश्चात पत्नी, विवाहित 3 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे. पुसद पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.

Edited By- Digambar Jadhav 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बँकांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित नाही; PNB बँकेतून सुमारे 35 कोटी गायब

ठाकरे-फडणवीस एकत्र येणार? पुढच्या पाच महिन्यात राजकीय भूकंप?

भरपूर पाणी प्यायल्यानंतरही होतो 'किडनी स्टोन'? नवीन संशोधनाचा धक्कादायक खुलासा

Fact Check: 1 हजाराची नोट पुन्हा चलनात येणार? 1 हजाराच्या नव्या नोटेचा फोटो जारी?

2029 पर्यंत महायुती टिकणार का? विधानपरिषदेत हार, महायुतीत एकमेकांवर वार

SCROLL FOR NEXT