बातम्या

'त्या' महिलेनं नको त्या ठिकाणी लपवलं कोकेन

साम टीव्ही न्यूज

मुंबई: ड्रग्सची तस्करी करणारे लोकं कसे आणि कोणत्या पद्धतीनं त्याची तस्करी करतील काहीही सांगता येत नाही. असाच एक प्रकार मुंबईच्या आंतर्राष्ट्रीय विमानतळावर घडला आहे.

मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या बोलिविया देशातील महिलेच्या पोटातून १३ ड्रग्सने भरलेले निरोध काढण्यात आले आहेत. त्यात ३०० ग्रॅम कोकेन सापडले असून त्याची किंमत एक कोटी रुपये आहे. या महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसुल गुप्तवार्ता संचलनालयानं (डीआरआय) अटक केली होती.

महसुल गुप्तवार्ता संचलनालयानं (डीआरआय) बोलिविया देशातील नागरीक असलेल्या महिलेला कोकेनसह शुक्रवारी अटक केली. रिबेरा अनेज डिलिसिया(५४) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती साओपावलोमधून अदिस अबाबा मार्गे मुंबई विमानतळावर दोन मार्चला आली होती.

 डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, अदिस अबाबा येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी या महिलेला ताब्यात घेण्यात आले. या महिलेच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता या महिलेवर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्या अंतर्गत जे.जे. रुग्णालयात तिचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्या पोटात संशयीत कॅप्सूलजन्य वस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून या १३ निरोध बाहेर काढले. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ३०० ग्रॅम असून त्याची किंमत एक कोटी रुपये आहे. दोन दिवस तिच्यावर वैद्यकीय उपचार करून हे निरोध काढण्यात आले. चौकशीत हा माल तिला सांताक्रुझ येथील दोन नायजेरीन व्यक्तींना द्यायचा होता. हा माल ब्राझीलमधील एका नायजेरीयन ड्रग्स तस्कराने पाठवला होता. मुंबई किंवा मकाऊ येथेही ड्रग्स नेण्यासाठी आरोपींनी तिला विचारले होते. तिने मुंबईला पसंती दाखवल्यानंतर एक दिवस आधी निरोधात लपवलेले ड्रग्स गिळून ती मुंबईत आली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT