dombivali collector 
बातम्या

भाजपच्या बॅनरबाजीला नागरिकांचा ठेंगा?

साम न्युज ब्युरो

डोंबिवली: केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसूली एप्रिल महिन्यापासून सुरु केली आहे. प्रथम सहामाही रुपये 300 व द्वितीय सहामाही 300 असे एकूण 600 रुपये आता मोजावे लागणार आहेत. या शुल्क वसुलीला/कराला आता भाजपाने विरोध केला असून याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हा कर रद्द करावा अशी मागणी केली आहे.तसेच भाजपने शहर बॅनर लावले आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर टिका केली. 

मात्र या करला नागरिकांचा विरोधा नसलायचे आता दिसून आले आहे. याबाबत केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या कराबाबत कोणत्याही नागरिकांनी तक्रार केली नाही. उलट कल्याण-डोंबिवली मधील नागरिकांनी आतापर्यँत सव्वा कोटी भरले आहेत. नागरिकांना खरे तर धन्यवाद मानले पाहिजे. त्यामुळे भाजपच्या बॅनरबाजीला नागरिकांची ठेंगा दाखवला की काय याची चर्चा आता रंगू लागली आहे.(Citizens in Dombivali have paid garbage tax)

हे देखील पाहा

दरम्यान, या अगोदर डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना आमने- सामने आले होते. त्यांनी एकमेकांच्या विरोधात बॅनर लावले होते. शिवसेनेने कचरा कर त्वरित रद्द करावा अशी मागणी भाजप करीत होता.  

 Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ShahRukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता; किंग खानची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अमरावती विमानतळावर दाखल

Famous Actress Death : सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT