SWATI RAVAL 960
SWATI RAVAL 960 
बातम्या

स्वतःचा जीव धोक्यात घालून इटलीहून 263 भारतीयांना आणणारी सुपर वुमन

सिद्धेश सावंत

नवी दिल्ली - रोज भारतात कोरोनाचे नवनवे रुग्ण आढळत आहेत. संख्या वाढते आहे. अशातच रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनामुळे सध्या सगळ्यात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. 

जिथे सगळ्यात जास्त कोरोनाचा कहर, तिथे गेली सुपर वुमन

कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या इटलीत वाढतच चालली आहे. रविवारच्या एका दिवसात तब्बल 651 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत आतापर्यंत तब्बल 5 हजार 476 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. जगातील सगळ्यात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जगभरात 14 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. जगभरात 14 हजार  443 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, फ्रान्समधील मृतांची संख्याही वाढतच चालल्याचं पाहायला मिळतंय. 

263 भारतीय विद्यार्थ्यांच्या एअरलिफ्टचं मिशन

अशातच इटलीमध्ये अडकलेल्या 263 विद्यार्थ्यांना एका विमानाने भारतात एअरलिफ्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे या विमानाचं सारथ्य एका महिला पायलटनं केलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून इटलीत आपल्या देश बांधवांना आणण्याचं मिशन राबवण्या-या या महिला पायलटचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या महिला पायलटचं नाव स्वाती रावल असं आहे. 

सुपर वुमन सुपर मॉमही आहे

इटलीतून परतल्यानंतर आता पायलट स्वाती रावल यांनी आयटीबीपी छावला कँपमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. विमानतळावर झालेल्या थर्मल आणि एमिग्रेशननंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. स्वाती फक्त पायलटच नाही तर एका मुलाची आईदेखील आहे. स्वाती रावल यांचं अशा काही मोजक्या महिला पायलटच्या यादीत घेतलं जातं, ज्या मुंबई- न्यूयॉर्क असा प्रवास करायच्या. गेली 15 वर्ष त्या पायलट म्हणून काम करत आहेत. 

फायटर न होताच फायटरसारखी कामगिरी


स्वाती यांना खरंतर फायटर पायलट बनायचं होतं. मात्र फायटर पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ न शकल्यामुळे त्या कमर्शिअल पायलट म्हणून काम करु लागल्या. इटलीहून 263 भारतीयांना एअरलिफ्ट करण्याच्या मिशनमध्ये मोलाचा वाटा उचलणा-या या सुपर वुमनचं सध्या संपूर्ण देशात कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामाची प्रशंसा करणा-या अनेक पोस्ट सध्या वायरल होत आहेत. 

TWEET - 

TWEET - 

TWEET - 

captain-swati-raval-becomes-the-first-female-pilot-to-operate-a-rescue-flight-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC SSC Result: मोठी बातमी! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवसांत उष्णतेची लाट येणार; मे महिन्याचा पहिला आठवडा 'ताप'दायक ठरणार

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या देशासह महाराष्ट्रातील आजचे भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT