बातम्या

BREAKING | चीनच्या कुरापती सुरूच

साम टीव्ही न्यूज


नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट १४ जवळ तंबूसारखी बांधणी केलेली दिसत असण्याच्या वृत्ताला भारतीय जवानांनी दुजोरा दिला आहे. उपग्रहांद्वारे टिपलेल्या ताज्या छायाचित्रात देखील हे तंबू उभे राहिलेले दिसत आहेत. हे सरळ सरळ कमांडर स्तरावरील चर्चेत ठरलेल्या सहमतीचे उल्लंघन आहे. तणाव कमी होणार असे वाटत असताना चीनने उचललेल्या या पावलामुळे भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भारत-चीन सैनिकांदरम्यानच्या हिंसक संघर्षानंतर तणाव निर्माण झालेला असतानाही सीमेवर चीनने आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. १५-१६ जूनला रात्री भारताच्या बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) जे तंबू काढून टाकले होते, ते तंबू चीनने त्याच जागेत पुन्हा उभारले आहेत.

पँगाँग त्सोपासून ते दौलत बेग ओल्डीदरम्यान पीएलए सैनिकांची कमितकमी १५ ठिकाणे आढळली असल्याचे सूत्रांनी द इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले आहे. यांमध्ये गलवान खोऱ्यातील झालेल्या हिंसक संघर्षानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) हलवण्यात आलेल्या सैनिकांचाही समावेश आहे. भारताने देखील आपल्या बाजूकडील सैनिकांची संख्या वाढवली आहे. एलएसीवर चीनी सैनिकांची संख्या १० हजारांहून अधिक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणांवर चीनी सैनिक आक्षेपार्ह स्थितीत तैनात आहेत. त्यांच्या मागे टँक आणि आर्टिलरी देखील आहे. शिवाय चीनने ऐडिशन सैनिक देखील तैनात केले आहेत.

दरम्यानच्या काळात एका नव्या तंबूची उभारणी सुरू झाली. पेट्रोल पॉइंट १४ वर चीनकडून मोठे तंबू उभारणीचे काम सुरू झाले असल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. चीन आपल्या सैनिकांसाठी नव्या बचावाच्या जागा आणि आश्रयस्थाने तयार करण्याच्या कामाला लागला आहे.गलवान खोऱ्याच चीनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या वेळी शहीद कर्नल संतोष बाबू यांनी चीनचे तंबू काढून टाकले होते. त्यानंतर दोन्हीकडील सैन्य पेट्रोल पॉइंट १४ पासून मागे हटले होते. या नंतर दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊन सहमती झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Constituency : धुळ्यातील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेरांमुळे शाेभा बच्छाव यांची वाढली ताकद

T20 World Cup 2024: टीम इंडियाबाबत मोठी बातमी! हार्दिक पंड्याऐवजी या खेळाडूला मिळू शकते संधी

Beed Lok Sabha : बीड लोकसभेच्या रिंगणात आता ४१ उमेदवार; १४ उमेदवारांची माघार

Lok Sabha Election : काँग्रेसच्या अडचणी वाढणार? मनसेचा पंजा चिन्हावर आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

Chhattisgarh Latest news : छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात जोरदार धुमश्चक्री; जवानांनी ४ नक्षलवाद्यांना शोधून टिपलं!

SCROLL FOR NEXT