Lok Sabha Election : काँग्रेसच्या अडचणी वाढणार? मनसेचा पंजा चिन्हावर आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

MNS Vs Congress : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर आक्षेप घेतलाय. निवडणूक आयोगाकडे देखील त्यांनी या चिन्हावरून तक्रार दाखल केली आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam tv

विनोद जिरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता काँग्रेसच्या पंजा चिन्हावर आक्षेप घेतलाय. चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील बोधचिन्हात देखील पंजा असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.

Lok Sabha Election
MNS News: किर्तीकुमार शिंदेंचा मनसेला रामराम! संदीप देशपांडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

मनसेचे राज्यउपाध्यक्ष अशोक तावरे यांनी ही तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या 'पंजा' या चिन्हावरून आता मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यउपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केली आहे.

निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारीवर तात्काळ निर्णय न झाल्यास या चिन्हाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा, अशोक तावरे यांनी दिला आहे.

दरम्यान, अगोदरच राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हांचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. विरोधी पक्षांमध्ये अससेल्या पक्षांमध्ये राज्यात फक्त काँग्रेसकडे त्यांचं आधीपासूनचं चिन्ह आहे. शिनसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला वेगवेळी चिन्हे देण्यात आलीत. त्यामुळे आता निवडणूक आयोग दाखल तक्रारीनुसार यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे .

Lok Sabha Election
Sangli Congress Melava: आमच्या भावना समजून घ्या..., सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटील समर्थकांनी घातला गोंधळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com