परभणी :देशातील हिंदू संयुक्त परिवारांना तथा करोडपती उद्योजकांना करांमध्ये सवलत मिळते, मग मुस्लिमानांही सवलत द्या ना, तुम्हीच म्हणता आमच्या इथे खूप मुले असतात. मग आम्हाला सवलत नको का? समान नागरी कायद्यात मुळात मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. शुद्ध पाणी देणे यात येते; परंतु सत्ताधाऱ्यांना पाणी देणे शक्य होत नाही आणि हे कायद्याची भाषा बोलतात, ओवेसी म्हणाले. देशाने फ्रान्समध्ये जाऊन राफेल विमान खरेदी केले. परंतु, त्या विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले. मात्र, मी नवी गाडी घेतल्यास लिंबू गाडी खाली ठेवले नसते तर त्या लिंबूचं सरबत करून सर्वांना पाजला असते. हे असे प्रकार करतात आणि यांना समान नागरी कायदा हवा आहे, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज परभणीत केली.
परभणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अली खान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, उमेदवार अली खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपकडे देशात समान नागरी कायदा करण्याची मागणी केली आहे; परंतु या कायद्याविषयी थोडीशी जरी माहिती असेल तर त्यांनी उद्याच्या सामनातून ती छापून आणावी, असे आव्हान त्यांनी ठाकरे यांना दिले. त्यासोबतच देश सध्या राफेल विमान खरेदी करत आहे. यासाठी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग फ्रान्सला गेले आहेत. मात्र, त्याठिकाणी विमानाच्या चाकाखाली दोन लिंबू ठेवले आहेत. ते लिंबू भारताचे नव्हे तर फ्रान्सचे आहेत. एकीकडे नवीन विमान खरेदी करताना हे चाकाखाली लिंबू ठेवत आहेत, तर दुसरीकडे यांना समान नागरी कायदा हवा आहे. हे कसे होईल ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Web Title asaduddin owaisi on rafale jets shastra puja
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.