बातम्या

फेसबुक वापरासाठी द्यावे लागणार पैसे?

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:   फेसबुक हे मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतयं..  सध्या फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून अधिक युजर्स आहेत. फेसबुकची विशेष बाब अशी की फेसबुकची सर्व सेवा यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळते. पण, कदाचित यापुढे फेसबुक आपल्या युजर्सकडून मेंबरशीप फी आकारण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.. 


फेसबुकच्या मुख्य पेजवर साइन अपचा पर्याय असतो. अकाउंट उघडायचं असेल तर इथे साइनअप करावं लागतं. काही दिवसांपूर्वीपर्यंत साइनअपच्या खाली 'It's Free and always will be' अशी टॅगलाइन दिसायची. मात्र आता ती बदलण्यात आली आहे. आता जुनी टॅगलाइन बदलून ती 'It's quick and easy' अशी केली आहे. वेबॅक मशीनच्या माहितीनुसार, फेसबुकने ही टॅगलाइन ७ ऑगस्टच्या आसपास बदलली आहे. 

युजर्ससाठी फ्री असूनही फेसबुक जाहिरातींच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहे. फेसबुक युजर्सना फ्रेंड्स आणि फॅमिलीशी कनेक्ट होण्याचा पर्याय देतं, पण बदल्यात ते युजर्सची वैयक्तिक माहितीही गोळा करतं. या डेटा अन्य कंपन्यांशी शेअर करतं, जेणेकरून कंपनी टारगेट युजर्सना जाहिरात दाखवून व्यवसाय वाढवू शकेल. 

 या सर्व प्रकरणी फेसबुककडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की फेसबुक युजर्सना पेड सबस्क्रिप्शनदेखील ऑफर करणार असेल. कदाचित या पेड व्हर्जनवर आणखी काही खास वैशिष्ट्ये असतील. सध्या तरी हा बदल का केलाय याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही .. 

WebTittle : Facebook company will change money for its services soon

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Govinda Maval Lok Sabha News | गोविंदा नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला

ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT