अण्णा हजारे. सामाजिक आंदोलनाद्वारे केंद्र सरकार आणि देश हलवून टाकणारं गेल्या काही दशकातील एकमेव मराठी नाव. अण्णांच्या दिल्लीतल्या आंदोलनाने जनलोकपाल जरी मिळाला नाही, तरी अरविंद केजरीवाल नावाचा नवा नेता मिळाला, आप हा पक्ष उदयाला आला. सामान्य भारतीय कधी नव्हे ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. 2014चं केंद्रीय सत्तांतर होण्यात या आंदोलनाचा व पर्यायाने अण्णांचा वाटा मोठा आहे. पण..पण, आज अण्णा काय आहेत? कुठे आहेत? आणि आहेत तसे ते का झाले आहेत?याचाच धांडोळा त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त घेणारा हा एपिसोड