Yavatmal News Saam tv
ऍग्रो वन

Yavatmal News: उत्पन्नात घट आल्याने चिंता; शेतकऱ्याने संपविले जीवन

Yavatmal News : शेतीसाठी दिड लाख तुप्यांचे बॅकेचे कर्ज काढले होते. यात यंदा पाऊस कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : सततची नापिकी, वाढणारा कर्जाचा बोज्यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. यंदा कमी (Yavatmal) पाउस झाल्याने शेतातील पिकांमधुन मिळणाऱ्या उत्पन्नात घाट झाल्याने विषारी द्रव्य प्राशन करून (Farmer) शेतकऱ्याने जीवन संपविल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील मोख येथे घडली आहे. (Maharashtra News)

यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील मोख येथील रहिवाशी बाळू चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव आहे. बाळू चव्हाण यांनी शेतीसाठी दिड लाख रुपयांचे बॅकेचे कर्ज काढले होते. यात यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे यंदा कापूस आणि सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याने बाळू चव्हाण हे चिंतेत होते. याच चिंतेतून मोख इथे शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन लहान मुले झाली अनाथ,

सततच्या नापिकीला आणि अंगावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे तीन लहान मुले अनाथ झाली आहेत. दोन लहान मुलं, एक मुलगी, पत्नी आणि आई- वडील असा मृतकच्या पाठीमागे परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT