कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला राजेश काटकर
ऍग्रो वन

कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

राजेश काटकर

राजेश काटकर

परभणी : जिंतूर Jintur तालुक्यामधील भोसी Bhosi, कुऱ्हाडी, गारखेडा Garkheda, सावरगाव, वडाळी, सोस, जोगवाडा आदी भागामध्ये शेतात वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून, खरीपातील Kharif कोवळ्या पिकांचे नुकसान मोठया प्रमाणात होत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. Wildlife infestation on crops increased

या वन्य प्राण्यांचा Of wild animals बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यामधील शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी जून महिन्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. परंतु, २० दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाल्याने, सध्या खरिपाची पिके बहरू लागली आहेत.

हे देखील पहा-

यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आहे. मात्र, आता वन्यप्राणी कोवळ्या पिकांवर ताव मारत असल्याने, नवीनच संकट शेतकऱ्या समोर उभे राहिले आहे. रोही, कोल्हे, हरीण, रानडुक्कर, वानर यासह अन्य प्राण्यांकडून रात्रीच्या वेळेस शेतात येऊन पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याचे, पहायला मिळत आहे. सोयाबीन Soybeans, कापूस, तूर, मूग, उडीद पिकांची पेरणी केलेली आहे. Wildlife infestation on crops increased

सध्या सोयाबीन तूर, मूग चांगल्या प्रकारे बहरले आहे. पण शेतात रात्रीच्या अंधाराचा Of darkness फायदा घेत, वन्यप्राणी या कोवळ्या पिकांवर ताव मारत आहेत. अशावेळी पिक पूर्ण पणे फस्त केले जाते. वन्य प्राणी शेतात येऊ नये, म्हणून अनेक शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जागाव लागत आहे. गारखेडा, वडाळी, भोसी आदि भागात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील सर्वच पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या रात्रीच्या वेळी रोही, हरण कळपाने फिरत आहेत. शेतकऱ्यांना रात्र- दिवस शेतात जागून काढावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून वनविभागाने जंगलात बंदिस्त करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT