Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : गेल्यावर्षीचेच पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत, संतापाचा कडेलोट; शेतकऱ्यांनी कार्यालयात केली तोडफोड

Washim News : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा भरला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : गतवर्षी पिकांचा विमा काढल्यानंतर देखील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त शेतकरी विमा कंपनीत गेले असता तेथून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कार्यलयातील सामानाची तोडफोड केली. 

वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा भरला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. त्यामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा देणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्याने संतप्त झालेल्या रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी वाशिमच्या कारंजा येथील पिक विमा कार्यालयात पोहचून विम्याची रक्कम देण्याची मागणी केली. (Crop Insurance) मात्र विमा प्रतिनिधीने अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी व कार्यकर्ते अधिक संतप्त झाले व साहित्याची नासधूस केली.

१८ हजार शेतकरी अजूनही वंचित 
कारंजा तालुक्यातील २०२३ साली ७० हजार ५८० शेतकऱ्यांनी पिकं विमा भरला होता. यात २५ हजार १७५ शेतकऱ्यांनी तक्रारी केली होत्या. यात केवळ ६ हजार ८७२ पीक विमा मिळाला. तर १८ हजार ३०३ शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT