Soybean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soybean Crop: रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात; शेंगा लागण्याच्या वेळेतच वाळू लागली झाडे

Wardha News : रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात; शेंगा लागण्याच्या वेळेतच वाळू लागली झाडे

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. परंतु सोयाबीन पीक (Soyabean Crop) रोगांच्या प्रादुर्भावाने धोक्यात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (Breaking Marathi News)

वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या मोरांगणा (खरांगणा) येथील गजानन वाघमारे यांनी पाच एकरात सोयाबीनची लागवड केली. सोयाबिन वाढले देखील. पण अचानक सोयाबीनची झाडं पिवळी पडून वाळू लागली. फवारणी करूनही प्रादुर्भाव थांबला नाही. त्यांना उत्पन्न येण्याची आशा मावळली असून केलेला खर्च निघण्याची शक्यताही नाही. यामुळं त्यांच्यापुढं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपूर्ण खर्च पाण्यात 
अशीच परिस्थीती अनेक शेतकऱ्यांची आहे. शेंगा लागण्याच्या वेळेतच झाडे वाळू लागली. यामुळे लागवडीपासूनचा अख्खा खर्च पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. अनेकांच्या शेतातील बिकट परिस्थितीने उत्पादनात घट होण्याची परिस्थिती आहे. काहींच्या शेतात तर सोयाबीनची झाडे वाळल्याने विदारक परिस्थिती आहे. सरकारने याबाबत लक्ष देण्याची गरज व्यक्त होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT