Gadchiroli; वेदना मांडणा-या बळीराजाचा व्हिडिओ व्हायरल संजय तुमराम
ऍग्रो वन

Gadchiroli; वेदना मांडणा-या बळीराजाचा व्हिडिओ व्हायरल

पै- पै जोडून उभ्या केलेल्या पिकाचे नुकसान बळीराजासाठी वेदनादायी ठरले

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

गडचिरोली : यंदाच्या पावसाने बळीराजाचा घात केला आहे. फुललेल्या पिकाची नासाडी झाली. पै- पै जोडून उभ्या केलेल्या पिकाचे नुकसान बळीराजासाठी वेदनादायी ठरले आहे. एका शेतकऱ्याने आपल्या वेदना गीतातून मांडल्या आहेत. पाण्यात बुडालेले सोयाबीन हातात घेत या शेतकऱ्याने गाणे गायले आहे. शेतक-याचे दैव कसे फिरले, सोयाबीन पाण्याने गेले " असे गीताचे बोल आहेत.

हे देखील पहा-

हा शेतकरी नेमका कुठला, याची माहीती नसली तरी व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बळीराजाच्या वेदना आज प्रत्येकच शेतकरी अनुभवत आहेत. गुलाब वादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील काही भागात जोरदार, मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. या पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. यामुळे सोयाबीन शेंगांना कोंब फुटू लागले होते, तर कापसाची बोंडे काळवंडली होती. या नैसर्गिक प्रकोपामुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. हातात येणारे पीक गेल्याने बळीराजा पूर्णतः खचला गेला आहे. बळीराजाच्या या वेदना एका शेतकऱ्याने गीतातून मांडल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Maharashtra News Live Update: दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या नेत्यासह दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT