कारंजा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा  गजानन भोयर
ऍग्रो वन

कारंजा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव, धनज बु.सह परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने प्रचंड नुकसान झाले

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कामरगाव, धनज बु.सह परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बीतील गहू, हरभरा, तूर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा संकटात आला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे (agriculture) पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यानंकडून करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

कामरगाव (Kamargaon) येथील प्रकाश गावंडे हे पारंपारिक पिकसोबतच भाजीपाला (Vegetables) पीक घेत आहेत. काल अचानक झालेल्या अवकाळी पावसासह (rain) गारपिटीने (Hail) भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने (District Administration) पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. अवकाळी पावसाचा फटका रब्बीतील पिकसोबतच संत्रा बागेला बसला आहे.

कारंजा (Karanja) तालुक्यातील भामदेवी येथील यांच्या २ एकरातील संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा बागेचे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजीपाला पिकसोबतच तूर, गहू, हरभरा, संत्रा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT