Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यातील सात ते आठ गावांना आज दुपारी गारपिटिने झोडपले. यामध्ये शेकडो एकरावरील द्राक्ष मातीमोल झाली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. (Latest Marathi News)
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील गोपाळपूर, कासेगाव, गादेगाव, टाकळी, मुंढेवाडी, या गावांना आज दुपारी वारे आणि अवकाळी गारपीटीने जोरदार झोडपले आहे. येत्या काही दिवसात जी द्राक्षे (Grapes) चांगल्या किमतीने बाजारात विकली जाणार होती ती माती मोल झाली आहेत.
गारपीट सुरू झाल्यानंतर द्राक्ष बागेतील अनेक घड तुटून जमिनीवर पडले. द्राक्ष मण्यांच्या सडा बागेत पडला आहे. जे घड शिल्लक राहिले आहेत ते सुद्धा वेलीवर फुटले आहेत. त्यामुळे या बागा मधून शेतकऱ्याला नुकसान शिवाय हाती काही लागणार नाही अशी वेळ आली आहे.
शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. याशिवाय आंब्याचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmer) सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.