jalna saam tv
ऍग्रो वन

Jalna News : जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड, नामांकित कंपन्यांच्या बॅगेत बोगस बियाणे; दोनशे क्विंटल सोयाबीन जप्त

कृषी विभागाने संपूर्ण साठा जप्त करून गोदाम सील केले.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : जालन्यात कृषी विभागाने गोदामावर धाड टाकत दोनशे क्विंटल सोयाबीनचा साठा जप्त केला आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाने साेयाबीनचे पॅकिंग केेले जात हाेते. या कारवाईमुळे नामांकित कंपन्यांच्या बॅगेत बोगस बियाणे भरुन ते विक्रीसाठी नेणा-या टाेळीचा पर्दाफाश झाला आहे. (Maharashtra News)

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातील एका गोदामात बाजारातून विकत घेतलेले बोगस बियाणे नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरून ते बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळताच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह पथकाने शुक्रवारी सायंकाळी गोदामावर धाड टाकून बोगस बियाणांचा मोठा साठा पथकाणे जप्त केला आहे.

जालना जिल्ह्यात यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढल्याने वाढती मागणी पाहता काहींनी बोगस बियाणांचा धंदा सुरू केल्याचं या कारवाईने मुळे उघड झाले आहे. कृषी विभागाने टाकलेल्या या धडीत जवळपास नामांकित कंपन्याच्या बॅगमध्ये ८३ क्विंटल बियाणे भरण्यात आल्याचे आढळून तर पोत्यामध्ये १८३ क्विंटल बोगस खुले बियाणे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याचं गोदामातून दोन ट्रक माल दोन दिवसापूर्वी बाजारात पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी विभागाने हा संपूर्ण साठा जप्त करून गोदाम सील केले आहे तर या प्रकरणी अधिक तपास ही कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान नामांकित कंपन्याच्या नावाने भरण्यात आलेल्या बॅगा मधील बियाण्यावर कुठल्याही प्रकारांची प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोयाबीनचे लहान मोठे दाने, माती मिश्रित रॉ मटेरियल अशा धक्कादायक बाबी समोर आले आहे.

धाड टाकण्यात आलेले गोदाम पूर्णा कळना शेतकरी प्रोड्यूसर कंपनी शेतकी उत्पादक गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने एका शेतकऱ्याला शेतमाल साठवणुकीसाठी हे भाड्याने दिल्याचे समजते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT