पर्यटन विकासासाठी शाश्वत आराखडा करणार- कृषीमंत्री दादा भुसे  दिलीप कांबळे
ऍग्रो वन

पर्यटन विकासासाठी शाश्वत आराखडा करणार- कृषीमंत्री दादा भुसे

कृषी पर्यटन आणि पर्यटन वाढीकरिता आलेल्या सूचनांचा पर्यटन विकासासाठी शाश्वत आराखडा करण्यात येईल

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : कृषी पर्यटन Agri-tourism आणि पर्यटन वाढीकरिता आलेल्या सूचनांचा पर्यटन विकासासाठी शाश्वत आराखडा करण्यात येईल. तसेच याबाबत प्रारुप गोषवारा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे यांनी मावळ Maval मध्ये दिला आहे. मावळात इंगळून पारीठेवाडी Ingalun Parithewadi या ठिकाणी राज्यातील कृषी पर्यटक केंद्र धारकांसाठी चर्चासत्र Discussion session आयोजित करण्यात आले होते.

हे देखील पहा-

त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या Corona काळात कृषी पर्यटनाची खूप हानी झाली आहे. अजूनही शेतकरी त्यातून सावरलेला नाही. आपण बोलण्यापेक्षा कृती करू असे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले आहे. राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांतून कृषी पर्यटन वाढले आहे, असे सांगून पर्यटन विकास होत आहे. आताच्या धोरणात अधिकच्या नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश व्यापक स्वरूपात असणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

मावळातील अनेक पॉलीहाऊस शेती करणारे शेतकऱ्यांचे farmers टाळेबंदीत कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे मावळात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने होत्याचे नव्हते झाले आहे. मात्र, अजूनही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने, त्यानी आपली खंत व्यक्त केली आहे. कृषी कायद्यात सुधारणा करावी ही मागणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT