Tomatoes Saam Tv
ऍग्रो वन

गृहिणींचं बजेट कोलमडलं! टोमॅटोचे दर शंभरी पार...

किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार 80 ते 100 रुपये किलो भाव

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

जुन्नर: राज्यात टोमॅटो उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव टोमॅटो बाजारात टोमॅटोला (Tomato) विक्रमी बाजारभाव मिळतोय. या बाजाराभावाच्या तुलनेत पुणे, मुंबईतील किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये मिळतोय. पुढील काळात हाच बाजारभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

मागील दोन वर्षात जुन्नर (Junnar) भागात 3500 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली होती. मात्र, टोमॅटोला विविध रोगांनी ग्रासल्याने पिकांची फेरपालट व्हावी यासाठी टोमॅटो लागवड घटविण्यात आली. अशातच लग्नसराई, जत्रा यात्रा उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांमधील जेवनावळी वाढत असताना टोमॅटोची मागणी अचानक वाढली पर्यायाने आवक कमी असताना मागणी वाढल्याने सध्या टोमॅटोच्या दरात झापाट्याने वाढ होत आहे.

मागील काही वर्षांपासून टोमॅटोवरील रोगराई, आवकाळी पाऊस चक्रीवादळात टोमॅटो उत्पादनावर मोठा परिणाम झाला त्यातुन पुन्हा टोमॅटोवर नव्याने संकटं उभी रहात आहे. वाढत्या तापमानात टोमॅटो बागांना उभारी देत असताना फवारणी आणि खतांचा मारा वाढला आहे. पर्यायाने उत्पादन खर्चाने झपाट्याने वाढ झालीय. मात्र, उत्पादनात निम्माने घट होतेय त्यामुळे वाढत्या बाजारभावाच्या तुलनेत मिळणार बाजारभाव कमीच आहे, असल्याचे कृषी तज्ञ सांगातात

महाराष्ट्राबरोबर गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यातही उन्हाळी टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्याचे वाढते तापमान आणि रोगराईमुळे देशातच टोमॅटोच्या उत्पादनात घट झालीय. अशातच टोमॅटोवरील रोगराईवर मात करण्यासाठी टोमॅटो पिकांची फेरपालट करत असताना यंदा लागवडचे प्रमाण शेतकऱ्यांनी घटवलेय. त्यामुळे पुढील काळात टोमॅटो उत्पादन घट होऊन आजच्या तुलनेतील बाजारभाव चढ्या दराने राहाणार असल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील पाहा-

रोजच्या जेवनातील टोमॅटोने भाव खाल्याने शहरी भागातील नागरिकांचे तसेच गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडतेय. त्यातच पुढील काळात टोमॅटोचे बाजारभाव चढ्या पद्धतीने रहाणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने स्वयपाक घरातील टोमॅटो हद्दपार झाला तर नवल वाटायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT