Pune News , Tomatoes Stolen in Shirur saam tv
ऍग्रो वन

Tomatoes Stolen in Shirur : 400 किलाे टाेमॅटाे चाेरीस, पुणे ग्रामीण पोलिसांपुढे नवे आव्हान

Pune Crime News : चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे आहे.

रोहिदास गाडगे

Shirur News : सध्या टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने चाेरटे टोमॅटोला लक्ष करीत आहेत असा प्रकार राज्यातील विविध जिल्ह्यात घडत आहे. असाच एक प्रकार शिरुर तालुक्यात देखील घडला आहे. शेतक-याने मोठ्या प्रमाणात भांडवली खर्चातुन जपलेल्या टोमटोवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.  (Maharashtra News)

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे अरुण बाळासाहेब ढोमे या शेतकऱ्याने दिवसभर शेतात मेहनत करून काढून ठेवलेला टोमॅटो रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे ढाेमे चिंतेत पडला आहे.

ढोमे यांनी जवळपास 30 कॅरेट टोमॅटो (tomato) तोडून बाजारात येण्यासाठी गाडीत भरून ठेवला होता. मात्र याच टोमॅटोवर पाळत ठेवुन रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ढोमे यांच जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झालंय.

त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे. गेली काही दिवसापासून शेतीमालाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकरी वर्गामध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT