<div class="paragraphs"><p>यांत्रिकी पद्धतीने भात रोप वाटिका तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल</p></div>

यांत्रिकी पद्धतीने भात रोप वाटिका तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल

 

दिलीप कांबळे

ऍग्रो वन

यांत्रिकी पद्धतीने भात रोप वाटिका तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

मावळ : इंद्रायणी Indrayani भाताचे Rice माहेरघर म्हणून ओळखले, जाणाऱ्या मावळ Maval तालुक्यामध्ये भाताचे १२ हजार ५०० हेक्टर इतक्या क्षेत्रावर भात शेती केली जाते. ५२ हजार ५०० हेक्टर इतक्या, क्षेत्रावर पुणे Pune जिल्ह्यात भातशेती केली जाते.मावळ मध्ये यांत्रिकी Mechanics पद्धतीने भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा farmers जास्त कल दिसत आहे. The tendency of farmers to cultivate rice mechanically

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील जुन्नर Junnar, आंबेगाव, मावळ Maval, मुळशी, वेल्हा, भोर, राजगुरुनगर या तालुक्यांमध्ये हे भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. भाताची लागवड ही गादी वाफा, चार सूत्री पद्धत,आणि सर्वात चांगली पद्धत म्हणजे यांत्रिकी पद्दत. यामध्ये वेळेची आणि मजुरांची बचत होते. पुनर्रलागवडीच्या भात शेतीमध्ये प्रामुख्याने शेतीची चिखलणी करणे, पुनर्र लागवड करणे, कापणी, झोडणी करणे या प्रमुख कामांचा समावेश होतो. बहुतांश भात लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते.

हे देखील पहा-

पारंपरिक लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास बराच कालावधी लागतो आणि शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतो. परंतु, भात पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर भात लागवड ही यांत्रिकीकरण पद्धतीचा अवलंब करावा असे मत भात संशोधक केंद्याचे प्रभारी अधिकारी डॉक्टर नरेंद्र काशीद यांनी व्यक्त केलं आहे. भात रोपवाटीका तयार करत असताना, प्रामुख्याने प्लास्टिक कागद अथवा ट्रे चा वापर करून, यामध्ये प्रामुख्याने २ भागात माती व १ भाग चांगले कुजलेले शेणखत अथवा गांडूळ खत चाळून घ्यावे. The tendency of farmers to cultivate rice mechanically

प्लास्टिक Plastic कागदाचा वापर करत असताना एक बाय एक चौरस मीटर लोखंडी पट्टीचा आखणीसाठी वापर केला जातो. परंतु बाजारामध्ये Market प्लास्टिकचे ट्रे उपलब्ध झालेले आहेत. यामध्ये माती व शेणखत यांचे चाळलेले मिश्रण व्यवस्थित भरले जाते. त्यावर बीजप्रक्रिया केलेल्या बियाणांची पेरणी केली जाते. ट्रे मध्ये बियाणांच्या पेरणीसाठी विविध प्रकारच्या मशि्न्स उपलब्ध झालेले आहेत.

बियाणे एकसमान ट्रे मध्ये पेरले जाते व रोपांची वाढ उत्तम होते, त्यामुळे वेळेची बचत होते. साधारणता रोप वाटिकेतील भात रोपांचे कालावधी २२ ते २६ दिवसाचा असतो. त्यानंतर रोपे लावणी करता, आपल्याला वापरता येतात. अशी तयार झालेली रोपे ४ ओळ लागवड यंत्र अथवा ८ ओळ लागवड यंत्राने सुलभ रीतीने चिखलणी करून उत्तम प्रकारे लागवड करता येतात. यामुळे वेळेची व मजुरांची बचत होते. The tendency of farmers to cultivate rice mechanically

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT