Nandurbar News  Saam TV
ऍग्रो वन

गव्हाचे पीक वाचवायला गेला अन् शेतकरी आगीत होरपळला!

शेजारच्या शेतातील ऊस पिकाला लागलेल्या आगीपासून स्वतःच्या शेतातील गव्हाचे पीक वाचवण्यासाठी आग विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदूरबार: शेजारच्या शेतकऱ्याचा शेतात लागलेल्या ऊसाची आग आपल्या शेतातील गव्हाच्या पीकात पोहचु नये यासाठी ती विझवण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा आगीत होरपळुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहादा तालुक्यातील बामखेडामध्ये घडली आहे. संजय एकनाथ चौधरी असे या ५६ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या शेताला लागुन असलेल्या गणेश पटेल याच्या शेतातील ऊसाला आज दुपारी आग लागली होती. सदरची आग ही शॉट सर्कीट मुळे लागल्याचा अंदाज आहे.

मात्र आगीनं रौद्ररुप धारण केल होते. शेजारच्या शेतातील आग वाढुन आपल्या शेतात येवु नये आणि आपल्या शेतातील गव्हाच्या पिकाचे नुकसान होवु नये म्हणुन संजय चौधरी हे देखील आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग विझवतांना त्याचा आगीत होरपळुन मृत्यु झाला आहे. आग विझवतांना त्यांचा पाय ऊसात उडकुन पडल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेप्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT