Thane Rain Saam tv
ऍग्रो वन

Thane Rain : ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका; ९० टक्के भात शेती गेली वाया

Ambarnath News : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे

अजय दुधाणे

बदलापूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा ठाणे जिल्ह्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापुर तालुक्यात जवळपास ८० ते ९० टक्के भातशेती या पावसामुळे अक्षरशः वाया गेली आहे.

राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात झालेल्या मुसळधार (Rain) पावसामुळे शेतीचे अगोदरच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला होता. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी कसातरी पीक काढणीला लागला होता. मात्र आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 

ठाणे (Thane) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील आठवडाभर या भागात जोरदार परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे कापणीला आलेले भाताचे पीक अक्षरशः झोपले आहे. शेतात गुडघाभर पाणी साचलं असून भात पिकाला कोंब फुटल्यामुळे हे पीक वाया गेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी रडकुंडीला आला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

रात्री आक्रित घडलं; संततधारेमुळे भिंत खचली, गाढ झोपेत वृद्ध दाम्पत्यांच्या अंगावर पडली; जागीच मृत्यू

Maharashtra Politics : "ठाकरे बंधू एकत्र यावेत ही लोकांची इच्छा" माजी आमदार वैभव नाईकांनी दिले ठाकरे बंधूंच्या एकीचे संकेत

Mumbai Dahi Handi History: मुंबईत कधीपासून सुरू झाला दहीहंडी उत्सव, 100 वर्षाचा जुना इतिहास

KBC 17: ऑपरेशन सिंदूरच्या विरांगणा केबीसीच्या मंचावर; शक्तीसह युक्ती प्रदर्शन करुन जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT