Satara APMC Election News, Raju Shetti, swabhimani shetkari sanghatana saam tv
ऍग्रो वन

Satara APMC Election News : आम्ही लढणारी माणसं, 'स्वाभिमानी' चा कार्यकर्ता धमक्यांना भीक घालत नाही : राजू शेट्टी

राजकारणाव्यतरिक्त राजेंचे कार्य असते असेही शेट्टींनी नमूद केले.

Siddharth Latkar

Raju Shetti News : सातारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (satara apmc election) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी व व्यापारी, हमाल दलाल यांच्यासाठी पॅनेल उभे केले आहे. या पॅनेलला यश मिळाल्यानंतर बाजार समितीमधील चुकीच्या गाेष्टी थांबविण्यात येतील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आज सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राजू शेट्टी म्हणाले शेतकरी व व्यापाऱ्यांना मोकळीक देण्यासाठी सातारा बाजार समितीत पॅनेल उभे केले आहे. ही निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. त्रास दिला गेला. पण, आम्ही लढणारी माणसे असून रडणारी नाही. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही धमकीला भीक घातली नाही, असेही शेट्टी यांनी नमूद केले.

दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest news) हे नेहमी शेतक-यांच्या पाठीशी उभी राहतात याचा आम्हांला अनुभव आहे. त्यांनी आमच्या पॅनेलला पाठबळ दिले आहे. राजकारणाव्यतरिक्त राजेंचे कार्य असते असेही शेट्टींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

Maharashtra Live News Update: ठाण्यात जोरदार पाऊस; वंदना टॉकीज परिसरात पाणी साचले

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

Success Story: विदेशात शिक्षण, लाखो रूपयांची नोकरी सोडली अन् झाला IPS, अमित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

SCROLL FOR NEXT