swabhimani shetkari sanghtana Latest News, Beed Latest News saam tv
ऍग्रो वन

Swabhimani Shetkari Sanghatana News : ...अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; 'स्वाभिमानी'चा सरकारला इशारा

जगाला अन्न धान्य पुरवाणारा राज्यातील कष्टकरी बळीराजा नैसर्गिक संकटात आहे.

संजय जाधव

Prashant Dikkar News : सतत दोन दिवस गारपिटीमुळे झालेल्या टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची शासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghtana) विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. अन्यथा सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला आहे. (Maharashtra News)

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारात सुरेश बन्शिलाल चांडक यांचे शेतामधे तुळशिराम सोनाजी कुरवाडे यांनी ७ एकर शेतावर टरबुज लागवड केली होती. कुरवाडे यांनी परिवारासह शेतात रात्र दिवस मेहनत घेऊन बाग फुलवली पंरतु अचानक टरबुज तोडनीपुर्वी प्रचंड प्रमाणात गारपिट झाल्यामुळे सर्व ७ एकर टरबुज बाग उध्वस्त झाली. त्यातील एक फळ सुध्दा खायला शिल्लक उरले नाही.

तुकाराम कुरवाळे यांच्या प्रियंका नावाच्या मुलीचा याच टरबुज पिकांचे पैशावर २९ मे ला विवाह होणार होता. तर दुसरी मुलगी अंबिका हि १२ वी सायन्स ला शिकत आहे. पंरतु दोन तास चाललेल्या गारपिटीमुळे होत्याच नव्हत झाले. आणि घेतलेली मेहनत वाया गेली. मुलीच्या लग्नासाठी आणि अंबिकाचे शिक्षण व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न करीत शेतकरी तुकाराम कुरवाडे ढसा ढसा रडले.

यावेळी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेती मालक सुरेश चांडक व शेतीकसणार तुकाराम कुरवाडे यांना शासनाकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मीळवुन देणार असल्याचा विश्वास यावेळी प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांशी बोलतांना दिला.

जगाला अन्न धान्य पुरवाणारा राज्यातील कष्टकरी बळीराजा नैसर्गिक संकटात आहे. दररोज आत्महत्या करीत आहेत. अशी नाजुक परिस्थिती असतांना देखिल राज्याचे मंत्रिमंडळ अयोध्येचे दौरे करित् आहे.

यांना शेतकऱ्यांचे काहिच देणेघेणे नाही केवळ अयोध्येला जाऊन धार्मिक मुद्दा उपस्थित करुन वातावरण निर्माण करणे आणि मतांची बेरीज जुळवा जुळव करण्यासाठी हा खटाटोप चालु असल्याचा गंभिर आरोप प्रशांत डिक्कर यांनी केला आहे.

सरकारने वेळकाढूपणा न करता गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

Border 2: सनी देओलची फौज 'बॉर्डर 2' साठी तयार; चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर

Women iron deficiency: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आयर्नची कमतरता का असते अधिक? काय असू शकतात कारणं जाणून घ्या

Samuruddhi Kelkar Video: अवखळ हासरी, अल्लड लाजरी; समृद्धी केळकरला पाहून चाहते झाले खुश

Vinesh Phogat: विनेश फोगाटचं कमबॅक! निवृत्तीचा निर्णय मागे; २०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळणार

SCROLL FOR NEXT