Beed: जिल्ह्यात ऊस गाळप प्रश्न ऐरणीवर; शेतकरी आर्थिक अडचणीत Saam TV
ऍग्रो वन

Beed: जिल्ह्यात ऊस गाळप प्रश्न ऐरणीवर; शेतकरी आर्थिक अडचणीत

ऊस गाळपाचा प्रश्न सुटला नाही, तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता.

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात तब्बल 2 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली असून यामुळे आता ऊस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस कारखाना घेऊन जात नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवा प्रश्न उभा ठाकला आहे. जास्त दिवस शेतात ऊस राहिल्यामुळे त्याची रिकवरी आणि वजन घटत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांसमोर आता आर्थिक संकट निर्माण झाले आहे. (Sugarcane crushing issue in the district Beed)

बीड तालुक्यातील धानोरा गावातील शेतकरी रमेश इंगोले यांनी मोठ्या कष्टातून ३ एकर उसाची लागवड केली होती. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे उसाचे उत्पन्न चांगले येईल व फायदा होईल, असे स्वप्न रमेश इंगोले यांनी पाहिले होते. मात्र तोडणीला आलेला ऊस साखर कारखाना घेऊन जात नसल्याने, शेतकऱ्यांसमोर नवं आर्थिक संकट उभे राहिले आहे. दीड महिन्यापासून पाठपुरावा करून देखील काहीच होत नाही, शेतपण गुंतून पडले त्यामुळे दुसरे पीक देखील घेता येत नाही. त्यामुळे ऊस पेटवून द्यावा लागेल, अशी संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केली आहे. बीड सारखीच परिस्थिती उदंड वडगाव येथील शेतकरी नंदलाल चव्हाण यांची देखील आहे. त्यांच्या शेतातील ऊस देखील गेल्या २ महिन्यापासून शेतात पडून आहे. उसने घेतलेले पैसे मागण्यांसाठी लोक रोज दारात येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊस घेऊन जावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हे देखील पहा-

बीड जिल्ह्यात एकूण 11 साखर कारखाने आहेत. त्यामध्ये 4 खाजगी आहेत तर 7 सहकारी साखर कारखाने आहेत. त्यामध्ये 2 सहकारी साखर कारखाने चालू आहेत तर 5 सहकारी साखर कारखाने बंद आहेत. तर खाजगी साखर कारखान्यापैकी येडेश्वरी शुगर मिल्स केज, शिवछत्रपती साखर कारखाना माजलगाव, जय महेश शुगर इंडस्ट्रीज माजलगाव, भीमाशंकर शुगर इंडस्ट्रीज चौसाळा, हे ४ कारखाने खाजगी तत्त्वावर चालू आहेत. त्याचबरोबर 5 सहकारी साखर कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांना ऊस हा खाजगी कारखान्यावर घालावा लागत आहे. त्यामुळे खासगी साखर कारखानदारांची मनमानी या ठिकाणी चालत आहे.

बीड जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अतिरिक्त झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडेल आहेत. सहकारी साखर कारखाने नुसते नावाला आहेत. सहकारी साखर कारखान्यांसाठी पुढाऱ्यांनी नुसत्या, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. स्ट्रक्चर उभे केले असून 4-2 गाळप करून कारखाने बंद आहेत. या कारखान्याचे जे कर्तेधर्ते संचालक मंडळ आहे, यांनी फक्त राजकारणासाठी आणि सहकार्यासाठी कारखाण्याचा वापर केल्याचा आरोप, शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऊसा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या वाढतील. अशी चिंता शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान सहकारी साखर कारखाने लवकर सुरू नाही झाले नाही, तर बीड जिल्ह्यामध्ये ऊस प्रश्न चांगलाच पेटणार आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जाण्यास नकार देत असल्यामुळे, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहत आहे. तसेच जास्त दिवस ऊसाची तोडणी झाली नाही तर त्याच्या वजनामध्ये व रिकवरी मध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे तात्काळ साखर कारखाने सुरू करावेत आणि ऊस घेऊन जावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT