अमर घटारे
अमरावती - एकीकडे गेल्या दहा दिवसा पासुन सत्ता स्थापनेच सत्र सुरु असताना. यात शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर (Farmer) आता उपासमारीची वेळ आली आहे. वन्य प्राण्यांचा संचार बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर होऊ नये याकरिता १५ फूट उंच भिंत रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आली आहे. मात्र हीच भिंत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणते आहे. या भिंतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्यात.
विकासाचा वेगवान महामार्ग म्हणून समृध्दी महामार्गाची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृषटीकोनातून समृध्दी महामार्ग साकारण्यात आलाय.हा महामार्ग अमरावतीच्या धामणगाव रेल्वे,चांदुर रेल्वे,नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातून जातो. या महामार्गाचा शेतकऱ्यांना पाउलो पावली त्रास सहन करावा लागतो आहे. सद्या खरीप हंगामातील पेरणीची वेळ असताना, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने, शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्या आहेत.शेतकऱ्यांनी यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवलेत.
हे देखील पाहा -
कागदी घोडे नाचवून काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील वर्षी देखील पावसामुळे शेतकऱ्यांच्या महामार्गालगत असलेल्या जमिनी खरडून गेल्यात.त्याचा मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे. परिणामी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे रस्त्याची मागणी केली आहे.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलवून शेतकऱ्यांना रस्ता देण्याबाबत सूचना केल्यात.मात्र धिम्म प्रशासन वेळकाढू धोरणात दिसत आहे. सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असताना, एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील का? विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्तेकडे वळला जातोय. याकडे मुख्यमंत्री तरी लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.