Solapur News Saam tv
ऍग्रो वन

Solapur News : लाईट गेली, फ्यूज बसवण्यासाठी गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

विश्वभुषण लिमये

सोलापूर : शेतात केलेल्या बोअरवेलला वीज पुरवठा करणाऱ्या विद्यूत पेटीमध्ये वीज प्रवाह उतरलेला होता. या पेटीला धक्का लागल्याने विजेचा जोरदार झटका बसून तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी गावच्या हद्दीत पाटील वस्तीवर घडली.

सोलापूरच्या (Solapur News) मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी या गावातील राजवर्धन नारायण पाटील (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजवर्धन हा शेतात कामानिमित्ताने गेला होता. यावेळी तो शेतातील बोअरवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या पेटीजवळ गेला होता. यात त्याने पेटीला हात लावला असता या पत्राचा पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने विजेचा जोरदार झटका (Electric Shock) बसला. यात राजवर्धन हा जागीच कोसळला. शेतात कोणी नसल्याने घटना लवकर समोर आली नाही. 

दरम्यान राजवर्धन याची पत्नी त्या ठिकाणी गेली असता खाली पडलेला दिसला. तिने तत्काळ आपल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर राजवर्धनला मोहोळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघाचा विषय थोडा अडचणीचा, गिरीश महाजन

Pune Crime : पुण्यात आणखी एक संतापजनक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केलं भयंकर कृत्य

Maharashtra Travel : अभेद्द जंजिऱ्यावरील तलावांचाही आहे रंजक इतिहास

Harshvardhan Patil News : शरद पवारांनी डाव टाकलाच! हर्षवर्धन पाटील 'तुतारी' हाती घेणार?

Air Pollution : हिवाळ्यातच हवा प्रदूषणाचा धोका का वाढतो?; हवेची PM पातळी म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT