Shindkheda News Saam tv
ऍग्रो वन

Shindkheda News : कर्जबाजारीपणातून दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; शिंदखेडा तालुक्यातील घटना

Shindkheda News : पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही.

Rajesh Sonwane

शिंदखेडा : पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. या कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतो. अशाच दोन घटना शिंदखेडा तालुक्यात घडल्या असून कर्जफेडीच्या विवंचनेतून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील देगाव येथील शेतकरी संजय आननसिंह गिरासे (वय ५०) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने राष्ट्रीयीकृत बँकेच्या (Bank) शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकले नाही. यातूनच संजय गिरासे यांनी शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा पुतण्या प्रवीण पहाडसिंह गिरासे यांनी त्यांना गळफास घेतल्याच्या स्थितीत पहिले यानंतर घटना उघडकीस आली. 

तापी नदीत उडी घेत संपविले जीवन 
तर दुसऱ्या घटनेत सुकवद (ता. शिंदखेडा) येथील बारकू चिंधा पाटील (वय ५१) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले असल्याने (Farmer) त्या कर्जाची परतफेड करता आली नाही. या विवंचनेत त्यांनी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. बारकू पाटील यांनी पुलावर दुचाकी उभी करत तापी नदीपात्रात उडी मारली. नीलेश प्रकाश पाटील यांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर स्थानिक लोकांच्या सहकार्याने बाहेर काढून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. काटे यांनी मृत घोषित केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

SCROLL FOR NEXT