सावकारीतून दीड एकर क्षेत्र बळकावले ; बारामतीमध्ये धक्कादायक प्रकार  SaamTv
ऍग्रो वन

सावकारीतून दीड एकर क्षेत्र बळकावले ; बारामतीमधील धक्कादायक प्रकार

व्याजाने दिलेल्या दोन लाखांच्या बदल्यात दीड एकर क्षेत्र बळकावल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश कचरे

बारामती : व्याजाने दिलेल्या दोन लाखांच्या बदल्यात दीड एकर क्षेत्र बळकावल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम अनुसार गुन्हा दाखल केला आहे. दिपक वाबळे, सर्जेराव वाबळे, अनिल वाबळे आणि राहूल वाबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.Seized one and a half acre area from the lender; Shocking incident in Baramati

हे देखील पहा -

शालन भुजंग वाबळे या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. दि. 20 ऑकटोबर 2017 ते 1 जानेवारी 2021 या दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. फिर्यादीने दिपक वाबळे यांच्याकडून 10 रुपये टक्क्याने दोन लाख रुपये 2017 मध्ये घेतले होते. त्या बदल्यात या चौघांकडून व्याजाच्या पैशाची मागणी होत होती.

व्याजाची रक्कम पाच लाख रुपये झाल्याने फिर्यादीला त्रास दिला जावू लागला. दिपक यांनी तुमच्याकडे पैसे नसतील तर दीड एकर क्षेत्र मला खरेदीखत करून द्या, अशी मागणी केली. त्यानुसार दोन वर्षांच्या मुदतीने खरेदीखत करून देतो, पैसे दिल्यावर खरेदी खत पलटी करून द्या अशी मागणी फिर्यादीने केली. त्याला अनुमती दिल्याने दुय्यम निबंधक कार्य़ालयात 7 लाख रुपयांच्या बोलीवर दोन वर्षात जमिन परत देण्याच्या अटीवर खरेदीखत करून देण्यात आले.

त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये फिर्य़ादीने 7 लाख रुपये गोळा करून दिपक यांच्याकडे जाऊन ठरलेली रक्कम घ्या व आमचे खरेदीखत पलटून द्या अशी मागणी केली. त्यावर अजून तुमच्याकडून 10 लाख रुपये येणे आहे, ते द्या तरच खरेदीखत पलटून देतो असे दिपक यांनी सांगितले. एवढी रक्कम आमच्याकडे नाही, असे फिर्यादीने सांगितले असता जमिन देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगण्यात आले.

त्यानंतर राहूल रामदास वाबळे यांच्याकडून 2020 साली 4 लाख 50 हजार रुपये मागितले असता त्यांच्या सावकारीतील अन्य साथीदारांनी संगनमताने ज्यादा व्याजाची मागणी करत त्यांना तेथून हाकलून दिले. व्याजाची रक्कम दिली नाही तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देखील या आरोपींनी पीडित महिलेस दिली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT