File Photo Saam Tv
ऍग्रो वन

Beed News : धक्कादायक! बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं भेसूर वास्तव...

गतवर्षी 210 शेतकरी आत्महत्या, तर यंदा अवघ्या 9 महिन्यात तब्बल 196 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

विनोद जिरे

बीड - नेहमी निसर्ग संकटात सापडलेल्या बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) आत्महत्येला कवटाळत असल्याने, गतवर्षीपेक्षा यावर्षी शेतकरी आत्महत्याच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाने इथला शेतकरी हातबल झाला आहे. सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा तर आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येकडे पाऊल उचलत आहे. (Beed Latest News)

दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये गतवर्षीपासून परतीचा पाऊस कहर करत असून यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतातील उभी पिकं नेस्तनाबूत झाल्यानं शेती उजाड झालीय. यामुळं पुढील अनेक वर्ष शेती पीकाऊ होते की नाही ? यावर देखील प्रश्नचिन्ह उभा ठाकलय. तर शेकडो एक्करमध्ये तळहाताच्या फोडासारखी जपलेली पिकं गुडघाभर पाण्यात अडकलीत.

यामुळं सोयाबीनची माती अन कापसाच्या वाती झाल्या आहेत. असे एक ना अनेक संकट शेतकऱ्यांपुढे उभे असताना, सरकार अन शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली उदासीनता, यामुळं शेतकरी हतबल झाला आहे. याच नैराश्यातून बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरु आहे.

बीड जिल्ह्यात 2021 या गतवर्षी तब्बल 210 शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दरबारी आहे. तर यंदाच्या 2022 च्या जानेवारी ते सप्टेंबर महिण्यात 196 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी पात्र 133 तर अपात्र 35 असून उर्वरित 28 अर्ज प्रलंबित आहेत.

कोणत्या महिन्यात किती शेतकरी आत्महत्या झाल्या

1) जानेवारी - 18

2) फेब्रुवारी - 24

3) मार्च - 29

4) एप्रिल - 15

5) मे - 22

6) जून - 30

7) जुलै - 17

8) ऑगस्ट - 23

9) सप्टेंबर - 18

तर अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेवली आहे. अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद उध्वस्त झालंय. सोयाबीनच्या घुगऱ्या तर कापसाच्या वाती झाल्यात. यामुळे आता आमच्या मुलांना दिवाळीचं काय खाऊ घालावे ? आमची दिवाळी कशी गोड होणार ? त्यामुळे मायबाप सरकारने आम्हाला मदत द्यावी. अशी मागणी अतिवृष्टी पीडित महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचं खूप मोठ विदारक चित्र निर्माण झालं आहे. या सोशल व्यवस्थेपुढं आपल्या लेकरा बाळांची पर्वा न करता, शेतकरी आपला जीव गमावत आहे. गेल्या वर्षी 210 तर यावर्षी केवळ 9 महिन्यांत 196 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मात्र याकडं सरकार आणि शासन गांभीर्याने पहात नाही.

महाराष्ट्रात राजकीय नाटक सुरू आहे. मुख्यमंत्री आणि राजकीय नेते दसरा मेळावा, हनुमान चालीसा, आणि चिन्हाच्या राजकारणात गुंतलेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत द्या, अन्यथा यापुढे शेतकरी आत्महत्या झाली तर आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात जाऊन, मुख्यमंत्री आणि शासनाविरोधात मानवी हत्येचा गुन्हा नोंद करू. असा सणसणीत इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी अन सुलतानी संकटाशी सामना करतांना हतबल होत आहे. दुष्काळ, त्यानंतर अतिवृष्टी आणि यातून हाताला न आलेली पिकं यामुळं इथल्या शेतकाऱ्यांपुढ जगावं कसं ? असा प्रश्न आहे. यामुळं बीड जिल्ह्याला लागलेलं हे शेतकरी आत्महत्येचं एकप्रकारचं ग्रहण, चिन्हासाठी धावा धाव करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिसणार का ? आणि शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांची चिन्ह पाहून मुख्यमंत्री अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांना सरसगट मदत देऊन दिवाळी गोड करणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT