Buldhana News : डॉक्टर सुट्टीवर, मृतदेह बराच वेळ पावसाच्या पाण्यात; मरणानंतरही यातना का? स्थानिक संतापले

रमेश गोप हा तरुण एका मित्राच्या घरी पाहुणा म्हणून आलेला होता. अचानक त्यांच्या मेंदूमध्ये ताप गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
Buldhana News
Buldhana NewsSaam TV
Published On

बुलढाणा : आदिवासी म्हणून ओळख असलेल्या संग्रामपुर तालुक्यामध्ये (Sangrampur Taluka) जवळपास एकशे पाच गावे येतात. तालुक्यातील गोर गरीब लोकांच्या उपचाराकरिता वसंतराव बकाल यांनी दान दिलेल्या जागेत वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालय उभारलेले आहे.

मात्र, या रुग्णालयात गेल्या 3 दिवसापासून एकही डॉक्टर (Doctor) उपलब्ध नाहीये. काल वसाडी येथे मित्राच्या घरी आलेल्या रमेश कैलास गोप वय वर्ष 23 या मृत पावलेल्या व्यक्तीचे प्रेत शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात आणले असता दुपारपर्यंत प्रेत गाडीत पडून होते.

पाहा व्हिडीओ -

प्रेत गाडीतुन खाली काढायला कोणी तयार नव्हते तर त्याचवेळी दुपारी अचानक जोराचा पाऊस (Heavy Rain) सुरु झाल्याने हे प्रेत पावसामध्ये भिजल्यामुळे नागरिकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गोप हा नायगाव झारखंड येथून वसाळी येथे एका मित्राच्या घरी पाहुणा म्हणून आलेला होता. अचानक त्यांच्या मेंदूमध्ये ताप गेल्यामुळे गावातील डॉक्टरांनी त्याला शेगाव येथे रेफर करण्यास सांगितलं. गावातील काही मित्रांच्या मदतीने त्याला शेगाव येथे उपचार करता नेण्यात आलं मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

Buldhana News
Parabhani : शेतकऱ्यांवर ओढावलं विचित्र संकट; रात्रीत गळून पडतेय बैलांची जीभ

त्यानंतर रमेशचा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) आणले. मात्र, या रुग्णालयमध्ये एकही डॉक्टर हजर नव्हते. स्थानिक नागरिकांनी सुद्धा या प्रेताचे हाल पाहिले.

नागरिकांचा आक्रोश पाहता अखेर संग्रामपूर वरुन आलेले डॉ. मारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रेताचे शवविच्छेदन करून जवळपास सहा वाजता प्रेत ताब्यात देण्यात आले. रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com