Turmeric Price Saam tv
ऍग्रो वन

Turmeric Price : पहिल्याच सौद्यात हळदीला मिळाला उच्चांकी दर; नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ

Sangli News : लागवड करण्यात आलेल्या हळद काढणीला सुरवात झाल्यानंतर शेतकरी हळद बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणू लागला आहे. हळद खरेदीचा शुभारंभ आजपासून करण्यात आला असून आज पहिला सौदा पार पडला

विजय पाटील

सांगली : हळद काढणीला सुरवात झाली असून शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहे. त्यानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातल्या हळद सौद्यांचा शुभारंभ करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते मुहूर्ताचे सौदे संपन्न झाले. यावेळी पहिल्याचं सौद्यात २१ हजार १०० इतका प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे.  

लागवड करण्यात आलेल्या हळद काढणीला सुरवात झाल्यानंतर शेतकरी हळद बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणू लागला आहे. हळद खरेदीचा शुभारंभ आजपासून करण्यात आला असून आज पहिला सौदा पार पडला. मुहूर्तावर काढण्यात आलेल्या या सौद्यामध्ये ३ हजार हळद पोत्यांची आवक झाली होती. यांचा सौदा आज करण्यात आला असून त्याला पहिल्या सौद्यात २१ हजाराच्या वर उच्चंकी दर मिळाला आहे. 

चढ उतार होण्याची शक्यता 

नवीन हंगामातील हळदीला चांगला दर मिळणार आहे. त्याचबरोबर आणखी काही दिवसांनी या हळदीच्या दरात चढउतार राहील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणावी, असा आवाहन सभापती शिंदे यांनी यावेळी केला आहे.

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात भाजी पाल्याच्या दरात कमालीची घसरण झाली. टोमॅटोला तर कवडीमोल भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात ५ रुपय किलो तर ठोक बाजारात एक ते दीड रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. नांदेडच्या गाडेगाव येथील यशवंत तिडके या शेतकऱ्याने आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली. सध्या टोमॅटो तोडणीला आले असून ठोक बाजारात एक ते दीड रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे शेतात या आणि फुकटात टोमॅटो घेऊन जा अशी ऑफरच या शेतकऱ्याने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT