सांगली : सांगलीमध्ये द्राक्षाचा हंगाम अद्याप सुरू झाला नाही. मात्र निर्यातक्षम द्राक्ष तयार होऊन आता रवाना होऊ लागले आहेत. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील प्रगतशील शेतकरी अरविंद माळी यांच्या द्राक्षे दुबईकडे रवाना झाली आहेत. यंदाच्या हंगामातील पहिलीच गाडी दुबईला रवाना झाली आहे.
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागातदार मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून अनेक शेतकरी हे एक्स्पोर्ट द्राक्ष जिल्ह्यातून शेतकरी तयार करून पाठवत असतात. त्यानुसार जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट माल पाठवला आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील होत असतो. तर स्थानिक बाजारपेठेत जाणारा माल काढणी अद्याप सुरु झालेली नाही.
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील शेतकरी अरविंद माळी यांनी आपल्या एक एकर शेतात निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. स्थानिक बाजारात जाणारा माल परिपक्व होण्यास अजून काही दिवसांचा कालावधी आले. मात्र माळी यांनी लागवड केलेल्या निर्यातक्षम द्राक्ष काढणी योग्य झाले असून त्याची तोडणी करून माल कंटेनरद्वारे दुबईला रवाना करण्यात आला आहे.
बांधावर १०८ रुपये भाव
दरम्यान माळी यांनी ट्रान्सपोर्ट केलेल्या द्राक्षांना प्रति किलो १०८ रुपये इतका दर मिळाला असून प्रति चार किलोच्या अडीच हजार पेट्याचा कंटेनर हा दुबईकडे रवाना झाला आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामात आटपाडी तालुक्यातुन माळी यांचा हा पहिलाच द्राक्षाचा कंटेनर रवाना झाला आहे. यात आणखी द्राक्ष काढणी होऊन आगामी काही दिवसात आटपाडीमधून आणखी एक कंटेनर रवाना होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.