Grapes Farm Saam tv
ऍग्रो वन

Grapes Farm : द्राक्ष बागावर वटवाघुळांचा हल्ला; रातोरात अडीच एकरावरील द्राक्ष केली फस्त

Sangli News : सांगली जिल्ह्यात देखील द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते. द्राक्ष लागण झाली असून येत्या काही दिवसात द्राक्ष परिपक्व होऊन ते काढले जातील. मात्र मागील आठवड्यात बदललेल्या वातावरणामुळे या द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

विजय पाटील

सांगली : अगोदरच बदललेल्या वातावरणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वातावरणाचा परिणाम द्राक्ष बागांवर देखील झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर आता सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नव संकट उभे ठाकले आहे. द्राक्ष बागांवर वटवाघूळांनी हल्ला चढविला असून एकाच रात्रीत अडीच एकरावरील द्राक्ष बाग फस्त केली आहे.  

सांगली जिल्ह्यात देखील द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते. द्राक्ष लागण झाली असून येत्या काही दिवसात द्राक्ष परिपक्व होऊन ते काढले जातील. मात्र मागील आठवड्यात बदललेल्या वातावरणामुळे या द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यातच वटवाघुळांनी बागांवर हल्ला केल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.  

काही दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातल्या हातूनर या ठिकाणी देखील वटवाघुळांनी द्राक्षबागांवर हल्ला करत द्राक्ष फस्त केल्याच्या घटना घडली होती. त्या पाठोपाठ पुन्हा एकदा वटवाघुळांच्या हल्ल्यात द्राक्ष बागेचे मोठं नुकसान झाले आहे. आधीच लहरी निसर्गाशी दोन हात करत मोठ्या कष्ठाने जगवलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघुळांच्या रुपी आलेल्या नव्या संकटामुळे जिल्ह्यातील द्राक्षबाग शेतकरी चिंतेत सापडला आहे. तातडीने याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष देऊन पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी द्राक्षबाग शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

१५ लाखांचे नुकसान 

सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातल्या मांजर्डे येथे वटवाघुळांच्या टोळीने तब्बल अडीच एकरावरील द्राक्षबाग रातोरात फस्त केली आहेत. गावातील द्राक्ष बाग शेतकरी शंकर साळुंखे यांच्या बागेमध्ये हल्ला करत हातात तोंडाशी आलेल्या द्राक्षांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सुमारे १५ ते ३० टन द्राक्षांचे सुमारे १४ ते १५ लाखांचा नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT