Sambhajinagar Rain  Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कोवळ्या पिकांना जीवदान

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यानंतर आलेल्या पावसामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. 

मान्सूनचा पाऊस (Rain) सुरवातीला आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करून टाकली होती. या पावसात पिके उगवली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. दरम्यान मागील तीन- चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके जाणवू लागले होते. परिणामी कोवळी पिके कोमेजून जात होती. यामुळं शेतकरी चिंतेत पडला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. 

अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चांगलीच दाणादाण उडाली. मागील अर्ध्या तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. तरी अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान नुकत्याच लागवड झालेल्या कपाशी पिकांसह ईतर कोवळ्या पिकांना तात्पुरत जीवदान मिळाले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

SCROLL FOR NEXT