Jayakwadi Dam Saam tv
ऍग्रो वन

Jayakwadi Dam : जायकवाडीचे बॅकवॉटर शेतात; हजारो हेक्टर पिके उध्वस्त, शेतकऱ्यांचे पाण्यात उतरत आंदोलन

Sambhajinagar News : जायकवाडी धरणामध्ये गाळ साचल्याने बॅक वाटर फुगवटा क्षेत्राचे पाणी गंगापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन व पिकांमध्ये शिरले

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे धरण फुल्ल भरली आहेत. दरम्यान जायकवाडी धरण देखील पूर्ण भरले असून धरणातील बॅकवॉटर आजूबाजूच्या परिसरातील शेतांमध्ये घुसले आहे. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही सर्व परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी कुटुंबासह पाण्यात उतरून आंदोलन केले आहे. 

जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) भरल्यानंतर धरणातील बॅकवॉटरचे पाणी गोदावरी नदीकाठच्या शेतीमध्ये घुसले आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्या नुकसानीसाठी आज कुटुंबासह नदीच्या पाण्यात उतरले आहेत. जायकवाडी धरणामध्ये गाळ साचल्याने बॅक वाटर फुगवटा क्षेत्राचे पाणी गंगापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन व पिकांमध्ये शिरले आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले जोमदार पीक पाण्यात गेले. परिणामी (Farmer) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हि नुकसान भरपाई कोण भरून देणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 

दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वेळोवेळी शासन दरबारी अर्ज तक्रारी, निवेदन दिले. मात्र उपयोग नाही. यामुळे हतबल झालेल्या गंगापूर तालुक्यातील गोदावरी काठच्या अमळनेर परिसरातील शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यासाठी पाण्यात उतरले आहेत. लहान मुलं आणि महिलासह शेतकरी जलसमाधी आंदोलनात दोन तासापासून पाण्यात उतरत आंदोलन केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT