farmer 
ऍग्रो वन

कशी प्रशासनाने थट्टा मांडली.., जिवंत शेतक-याची मृत नाेंद केली

अभिजीत घोरमारे

भंडारा : अरे भाऊ मि आहो न जीवंत....पैसे देता का पैसे..! ही आर्त हाक आहे भंडारा जिल्ह्यातील एका 70 वर्षीय वृध्द शेतकऱ्याची. किसान सन्मान योजने PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गतचा निधी का मिळत नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या संबंधित शेतक-याला farmer ऑनलाइन प्रणालीत मृत दाखविल्याने त्याला धक्का बसला. जीवंत व्यक्तिला चक्क मृत दाखविण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये देखील तीव्र नाराजी पसरली आहे. हा प्रकार काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात घडला आहे. शासकीय निधी पासून वंचित राहिलेल्या या शेतक-यास न्याय मिळावा अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील चांदोरी येथील शेतकरी निताराम ताणु राऊत यांनी सन २०२० कालावधीत किसान सन्मान योजनेअंतर्गत खाते उघडले. शासन नियमानूसार त्यावेळी त्यांच्या खात्यात एक महिन्याचा निधीही जमा झाला. त्यानंतर वर्ष लोटूनही त्यांच्या खात्यात निधी जमा झाला नाही. आपल्या खात्यात पैसे का जमा होत नाहीत याची चौकशी करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यावेळी प्रशासनाकडून त्यांची ऑनलाइन पोर्टलवर मृत म्हणून नाेंद झाल्याचे सांगण्यात आले. हे समजताच राऊत यांनी धक्का बसला. याबाबत ते म्हणाले मी जिता हाय, याचा पूरावा या अधिका-यांना दिल्यानंतर मला अनुदान मिळणार असल्याने मी विविध दाखले घेऊन साकोली तहसील कार्यालयात खेटा मारतोय. जिवंतपणी मेल्याचा अनुभव दिला बघा शासनाने असंही त्यांनी नमूद केले.

आता प्रत्यक्ष जीवंत असलेल्या माणसाला मृत घोषित नेमके कुणी केले, कसे केले गेले ह्या बाबत कुणी सांगत नसले तरी उपसमारीचे संकट येऊ नये यासाठी आमच्या आजाेबांना न्याय मिळावा अशी अपेक्षा नातू राकेश काटसर्पे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान राऊत यांंना वृद्धापकाळात साकोली तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविन्याची वेळ यापुढं येऊ नये यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या प्रकरणात लक्ष देणार का हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT