rs 965 crore fund for pradhan mantri crop insurance scheme dhananjay munde address media saam tv
ऍग्रो वन

Dhananjay Munde : ४७ लाख ६३ हजार शेतक-यांचे पीक विमा याेजनेचे नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर, रक्कम वाटपास प्रारंभ

काही ठिकाणी आक्षेपांच्या अपिलावर सध्या सुनावणी सुरु आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News :

पंतप्रधान पीक विमा योजनेतील पीक नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याची आगाऊ (अग्रिम) रक्कम वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ९६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Maharashtra News)

या विमा योजनेंतर्गत आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई मागणीचे अर्ज मंजूर झाले. उर्वरित निधीही येत्या दोन आठवड्यात उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील २४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. १२ जिल्ह्यांमधील नुकसान भरपाईबाबत विमा कंपन्यांचा काहीही आक्षेप नाही तर अन्य ९ जिल्ह्यांच्या बाबतीत अंशतः: आक्षेप नाेंदविण्यात आला आहे. या आक्षेपांच्या अपिलावर सध्या सुनावणी सुरु आहे. यापैकी सात जिल्ह्यांमधील सुनावणी पूर्ण झाली आहे.

दरम्यान राज्यात 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील 6 सहकारी आणि 4 खासगी मिळून 10 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे ऊस गाळप कमी होणार अशी चिन्हं आहेत. जिल्ह्यात 2023-24 च्या हंगामात 1 कोटी 51 लाख 90 हजार टनाइतक्या ऊसगाळपाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे अपेक्षेपेक्षा कमी ऊसगाळप होण्याची दाट शक्यता कारखान्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT