Onions, nashik , Lasalgaon APMC, Rahuri, Farmers, Swabhimani Shetkari Sanghatana, Rasta Roko Andolan saam tv
ऍग्रो वन

Onion Price : लासलगावात कांदा लिलावास प्रारंभ, दर वाढला; नगर- मनमाड महामार्गावर 'स्वाभिमानी'चा ठिय्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अजय साेनवणे, सचिन बनसाेडे

Lasalgaon APMC : कांद्याच्या दरात (onion price) वाढ द्यावी या मागणीसाठी शेतक-यांनी बंद ठेवलेला लिलाव आज (मंगळवार) नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत (Nashik Lasalgaon APMC Latest News) पुन्हा सुरु झाला. आज शेतक-यांना कांद्याच्या दरात शंभर रुपयांनी वाढ मिळाली आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत काल कांदा दरवाढी विरोधात झालेल्या आंदोलनानंतर आज बाजार समितीत कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले. कांद्याला कमीत कमी 300 रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये तसेच सरासरी 575 रुपये ते 600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

कालच्या तुलनेत 100 रुपयाने भाव वाढल्याचे पहावयास मिळाले. काल जवळपास 1000 हजार वाहने कांदा घेऊन आलेली होती. त्यातील 500 वाहनांचा लिलाव झाला आहे. आज पुन्हा नव्याने कांदा घेऊन गाड्या येत असल्याचे चित्र आहे.

राहूरीत 'स्वाभिमानी' चे आंदाेलन

कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्यभरात शेतक-यांकडून आंदोलनं केली जात आहेत. राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले.

राहुरी बाजार समितीसमोरील रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत धडा शिकवू असा इशारा देखील आंदाेलकांनी यावेळी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : हर्षवर्धन पाटलांनंतर आता रामराजे तुतारी हाती घेणार? मोठी अपडेट आली समोर

Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्गच्या आरोपांची होणार चौकशी

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT