Rohit Pawar Meets CM And DCM Saam TV
ऍग्रो वन

Rohit Pawar : डाेळ्यात अंजन घालण्याची गरज, कांद्याच्या दरावरुन राेहित पवारांनी सरकारला फटकारलं

कर्जत तालुक्यात खरीप हंगामातही मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सुशिल थाेरात

Rohit Pawar : नगर (nagar) जिल्ह्यातील कर्जत (karjat) तालुक्यात रब्बी हंगामात यंदा विक्रमी कांदा (onion) लागवड झाली आहे. १५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याने कांद्याचे उत्पादनही वाढणार आहे. मात्र कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकरी (farmers) हवालदिल झाला आहे. यावरुन आमदार राेहित पवार (rohit pawar) यांनी सरकारला (maharashtra government) धारेवर धरलं आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले आत्ताच सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना स्वारस्य नाही. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना आमदार पवार यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

यावर्षी कर्जत तालुक्यात खरीप हंगामातही मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उर्वरित कांद्याला दर मिळत नाही. कांद्याचे दर यावर्षी दहा रुपयांच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, तर कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली. मात्र कांद्याला दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT