Junnar News रोहिदास गाडगे
ऍग्रो वन

वाढत्या तापमानाचा फळबागा, तरकारी पिकं, भाजीपाल्याला सर्वाधिक फटका

पिकांवरील रोगराईमध्ये वाढ होऊन उभी पिकं करपण्याचे प्रमाण वाढले आहे.

रोहिदास गाडगे

जुन्नर - पुण्याच्या (Pune) ग्रामीण भागात तापमानाचा पार चांगलाच वाढला आहे. मागील चार दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाचा (Weather Update) फळबागा,तरकारी पिकं,भाजीपाल्याला सर्वाधिक फटका बसत आहे.

जुन्नर परिसरात ३८ ते ३९ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी पिकांसह फळबागांना सर्वाधिक फटका बसत आहे. यामुळे पिकांवरील रोगराईमध्ये वाढ होऊन उभी पिकं करपण्याचे प्रमाण वाढले आहे.

सध्या वातावरणाचे पिकांवर होणारे परिणाम आणि त्यावर उपायोजना काय कराव्यात याबाबत कृषी शिक्षण संकुलाचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

हे देखील पहा -

वाढत्या तापमानाचे परिणाम...

-आजच्या तापमानाचा पारा असाच राहिला तर 46 पर्यत तापमान जाईल..!

-उन्हाळी हंगामी पिकांना सर्वाधिक फटका...!

-थंडी पिकांची वाढ थांबली आणि आता वाढत्या तापमानाचे पिकांना चटके..!

-किड लागण्याचे प्रमाण वाढते

उपाययोजना...

-पिकांना जास्त प्रमाणात पाणी न देता नैसर्गिक उपाययोजना करावी,ड्रिपचा वापर करावा

-मल्चिंग पेपरचा वापर करावा

-तरकारी माल आणि पालेभाजांवर वाढती किड रोखण्यासाठी फवारणी करावी

-फवारणी करत असताना तापमानाच्या वेळी न करता सायंकाळच्या वेळी करावी..

-पाण्याचे योग्य नियोजन करुन पिकांना सावलीची व्यवस्था करावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT