पूर्णा नदीला पूर, दोन तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटणार; पाहा Video Saam TV
ऍग्रो वन

पूर्णा नदीला पूर, दोन तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटणार; पाहा Video

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून अमरावती (Amravati) अकोला जिल्ह्यात (Akola District) अतिवृष्टी झाली आहे

संजय जाधव

बुलडाणा: विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून अमरावती (Amravati) अकोला जिल्ह्यात (Akola District) अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे पूर्णा नदीला (Purna River Floods) महापूर आला आहे. या नदीवरील पुलावर पाणी असल्याने अकोला जिल्ह्यातील बरेच रस्ते बंद झाले आहेत, तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातून ही पूर्णा नदी वाहते त्यामुळे आता इकडे येरळी येथील पुलावर काही वेळातच पाणी वाहणार आहे. तसेच खिरोडा पुलावरून सुद्धा पाणी वाहायला लागेल त्यामुळे काही वेळातच दोन्ही पुलावरून पाणी वाहायला लागल्यावर संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याशी जिल्ह्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, म्हणून जिल्हा प्रशासनाने वाहनधारकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुलावर पाणी आले असेल तर पुलावरून प्रवास करू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठवाड्यात अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: बेजार केलं आहे. पिकांचं नुकसान झाले आहे. अजून सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना कसलीच मदत केली जात नाहिये. एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी बेजार असतानाच विदर्भात देखील नद्यांना पुर येऊ लागले आहेत. नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहे. त्यामुळे जी वेळ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर आली तिच वेळ विदर्भातील शेतकऱ्यावर येतीये का? हे येणारा काळच सांगेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT