Coriander, Pune Mandai saam tv
ऍग्रो वन

Pune Mandai News : पुण्यात पालेभाज्यांचे दर कडाडले, सामान्यांचं बजट गडबडलं, कोथिंबिरीचा भाव गगनाला... (पाहा व्हिडिओ)

वाढत्या महागाईमुळे नागरिकांना आर्थिक ताण साेसावा लागत आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे / प्राची कुलकर्णी

Pune News : काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि आता वातावरणात झालेला उच्चांकित तापमान याचा फटका पालेभाज्यांवर दिसू लागला आहे. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरात माेठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाट बसू लागली आहे. (Maharashtra News)

काही दिवसांपुर्वी पुण्यातील मंडईत कोथिंबीरीची (Coriander Price Hike In Pune Mandai) गड्डी दहा रुपयांना मिळत होती. परंतु गेल्या दाेन ते तीन दिवसांपासून कोथिंबीरीचा दर थेट 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहचला आहे. या बराेबरच मंडईत पालेभाज्यांना मागणी असली तरी त्याचेही दर वाढल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक बाेजा पडू लागला आहे.

याबराेबच गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे परिणामी मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पालक, पुदिन्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या सामान्यांना आता भाजी खरेदी करणे पण कठीण जातं आहे.

दरम्यान पुण्यातील मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पालक, पुदिन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर काही प्रमाणात ताण येणार असल्याचे दिसून येत आहे. घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीमागे २०० रुपये, कांदापातीच्या शेकडा जुडीमागे २०० रुपये, चाकवत, पुदिन्याच्या शेकडा जुडीमागे १०० रुपये, पालकाच्या शेकडा जुडीमागे ३०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी तरकारी विभागात कोथिंबिरेच्या सव्वालाख जुडी आणि मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे जुडीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. तर अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

Hair Care : रंग लावल्यावरही केस काही दिवसांत पांढरे दिसतात? टेन्शन सोडा अन् 'हा' उपाय आताच करा

OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटी हाउसफुल; प्रिया-उमेशची 'ही' रोमँटिक सीरिज नक्की पाहा

SCROLL FOR NEXT