नागरिकांच्या सुरक्षेसोबतच पर्यावरणाची रक्षा करणारा अवलिया... विनोद जिरे
ऍग्रो वन

नागरिकांच्या सुरक्षेसोबतच पर्यावरणाची रक्षा करणारा अवलिया...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - नागरिकांच्या सुरक्षे सोबतच पर्यावरणाची रक्षा करणाऱ्या अवलिया पोलीस Police अधिकाऱ्याने, लॉकडाऊनचा Lockdown सदुपयोग करत तब्बल ९१ गावात आणि बाजार तळावर स्व:खर्चाने शेकडो झाडे Tree जोपासली आहेत. विशेषतः बालाघाटच्या डोंगर रांगांवर ७५ हजार बियाचे रोपण केले. गाव खेड्यात तंटा मुक्ती बरोबरच, वृक्षारोपनाचे Tree Plantation महत्व कायद्याच्या भाषेत पटवून दिले. police who protects the environment along with the safety of the citizens

पोलीस अधिकारी म्हटले की सामान्य लोकांमध्ये कायद्याचा धाक असतो आणि हाच कायद्याचा धाक वापरून, बीडच्या नेकनूर येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी, वृक्ष लागवड चळवळ कार्यान्वित केली आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरात होते. गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे थोड्या प्रमाणात आम्हाला कामाचा ताण कमी झाला आणि त्याच मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील ९० गावात, सरपंच पोलीस पाटील आणि पत्रकारांना एकत्रित करत, अंकुर ग्रुपची स्थापना केली.

या ग्रुपच्या माध्यमातून, तब्बल ७५ हजार झाडांचे रोपण केले आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीसाठी देशी झाडांची निवड करत पिंपळ, वड, चिंच, जांभूळ या झाडांची लागवड केली.आज नेकनूरच्या बाजार तळावर लागवड केलेल्या झाडामुळे हिरवळ पसरली आहे. तर बालाघाट डोंगर रांगेतील आध्यत्मिक केंद्र श्री क्षेत्र कपिलधार, श्री क्षेत्र चाकरवाडी या देवस्थानाच्या जागेत वृक्ष संवर्धनाची चळवळ सक्रिय झाली आहे.

हे देखील पहा -

वृक्ष लागवडीचे प्रेम आई-वडिलांपासून मिळाले आणि लहानपणापासून मनामध्ये वृक्ष लागवडी बद्दल प्रेम होत. कॉलेजला असताना पण उदगीरमध्ये उजाड डोंगरावर झाडे लावायची इच्छा होती. झाडे लावायचो मात्र संगोपन होत नसायचे. जेव्हा पोलीस दलात भरती झालो, तेव्हा कायद्याची साथ मिळाली. ज्या ज्या पोलीस स्टेशनला मी सेवा केली, त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली.

विशेष म्हणजे नागपूर विभागात काम करताना, त्या ठिकाणच्या डोंगरावरील झाडे पाहिल्यानंतर मराठवाड्यातला अशीच झाड व्हावीत, अस वारंवार वाटायचे. त्यानंतर बीड जिल्ह्यात बदली होऊन आल्यानंतर बर्दापूर या ठिकाणी शेकडो झाडे लावली. लॉकडाऊनमुळे वेळच वेळ होता, यामुळे मित्रांना सोबत घेऊन वृक्ष लागवड सुरू केली. यात मला माझ्या काही पोलीस बांधवांचे देखील सहकार्य लाभले. सरपंच, पोलीस पाटील यांना एकत्र घेऊन ९१ गावात आज झाडे लावली आहेत आणि पोलीस झाडे लावत असतील तर ती जोपासली पाहिजेत असे लक्ष्‍मण केंद्रे यांनी सांगितले.

आजपर्यंत पोलीस दलात १९ वर्ष सेवा झाली. पोलिसानं संदर्भात लोकांच्या मनामध्ये आदर युक्त भीती असते. त्याचा वापर करत गावात गेलो, की लोक जवळ येत असे. सरपंच पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले. मी स्वतः शनिवार रविवार झाडे पाहायला जातो,त्यांची काळजी घेतो.असे देखील लक्ष्‍मण केंद्रे यांनी सांगितले.

दरम्यान लक्ष्‍मण केंद्रे यांनी डोंगर, दरी, रस्ते दूतरफा, तब्बल ७५ हजार झाडे लावलेत .प्रामुख्याने वड ,लिंब, पिंपळ, चिंच देशी झाडे आहेत. कर्तव्य बजावून निसर्ग संवर्धनाची दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकार्‍याचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे. कागदावरती वृक्ष लागवड करणारे वन विभागातील अधिकारी पहिले असतील, मात्र कायद्याचा धाक दाखवून वृक्षारोपण करणारा अधिकारीसुद्धा आहे. म्हणूनच आज बीडमध्ये वृक्ष लागवड चळवळ मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असून यामधील सकारात्मक चित्र समाधान देणारे ठरत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT